कळंब (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची) कळंब ही  1954 साली स्थापन झालेली सर्वात जुनी प्रशाला असून अनेक विद्यार्थी व अधिकारी घडविणारी शाळा म्हणून प्रसिध्द आहे. कळंब शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असून; भव्य क्रीडांगण नव्याने इमारतीचे बांधकाम सुसज्जअसे झालेले आहे. एस एससी बोर्ड परीक्षेचा एकूण उर्दू माध्यमाचा निकाल 96.15 % असून, एकूण 32 विदयार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यामध्ये गुनानुक्रमे शाळेतून उर्दू माध्यमाची प्रथम आलेली विद्यार्थिनी पठाण इरम जावेद 78.50 %, द्वितीय - मणियार शिफा मुशिर 77.80%, तृतीय - शेख जिया अझरुद्दीन 74% आहे.

मराठी माध्यमाची प्रथम आलेले तीन विदयार्थी - सय्यद इरफान रफिक, द्वितीय - पांचाळ पवन विक्रम, तृतीय - शेख साहिल शाहनवाज, विशेष प्राविण्य 3 विदयार्थी, प्रथम श्रेणी 20 विदयार्थी,  व्दितीय श्रेणी 4 विदयार्थी, तृतीय श्रेणी 4 विदयार्थी.

 प्रशालेतून 32 विदयार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 28 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेचा एकूण निकाल 87.50% लागला आहे. सदरील विदयार्थी हे अतिशय कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. तसेच झोपडपट्टीच्या मागास भागातून शिक्षणाचा कसलाही गंध नसतानाही त्यांनी हे यश खेचून आणले आहे. सदरील मुले हे गवंडी कामगारांची, किरकोळ विक्रेत्यांची असून त्यांनी हलाखीच्या गरीब परिस्थितीतून हे एसएससी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवील्याबद्दल कळंब शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक  शब्बीर अन्सारी, गणित विषय शिक्षक  शाह साबीर, इंग्रजी विषय शिक्षक डॉ. अशोक शिंपले, विज्ञान विषय शिक्षक नितीन गायसमुद्रे व  हिप्परगे मोहम्मद मेहदी, शेख तरणुमनिसा, पवार लता, झीनत शिरवल, वाघमारे सूर्यकांत व शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top