तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरातील श्री टोळभैरव मंदीर समोरील पायऱ्यावर असणारी नाली तुंबुन त्यातील पाणी मंदिरात येत असल्याने नाली  तात्काळ स्वछ करण्याची मागणी होत आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरातील श्री टोळभैरव मंदीर समोरील पायऱ्यावर असणाऱ्या नाली तुंबल्याने लोंखडी झाकण थोडसे उखडुन त्यातील येणारे सांडपाणी थेट उतार असल्याने टोळभैरव मंदिरा समोरुन मंदिरात येत आहे. सदरील मार्ग आता खुला केल्याने येथुन भाविकांची ये-जा सुरु असल्याने या सांडपाण्यातुन भाविकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे ही तुंबलेली नाली साफ करण्याची मागणी होता आहे. 

 
Top