धाराशिव (प्रतिनिधी)- फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि पिंपळ वृक्षाखाली तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. आलेल्या अनुयायांना मिठाई वाटप करण्यात आली. सध्या भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष चालु असुन संविधान जनजागरण बाबत चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हणतात आणि याच आरक्षणाचे अनुकरण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात केले. बुध्दिमत्तेचा अथांग सागर असलेल्या महामानवाला घरी स्वतः भेटायला जाणाऱ्या लोकराजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सर्व समाज बांधवांनी केले. यावेळी विजयमाला धावारे, धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, गणेश वाघमारे, प्रविण जगताप, बाबासाहेब जानराव, संपतराव शिंदे, स्वामीनाथ चंदनशिवे, अतुल लष्करे, मुकेश मोटे, स्वराज जानराव, विशाल घरबुडवे, सचिन दिलपाक, विनायक गायकवाड, राजेश गायकवाड, ओव्हाळ, जेटीथोर अन्य इतर उपस्थित होते.

 
Top