धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरास जिल्ह्यात शनिवारी व रविवारी सायंकाळी मृग नक्षत्रातील मुसळधार पाऊस बसरला आहे. या पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाला आहे. तर धाराशिव शहरातील नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहून लागले. या पावसामुळे शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे. 

जून महिन्यात मृग नक्षत्र कोसळल्यामुळे खरीपाची पेरणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेळीत पेरणी झाली तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, समर्थ नगरमध्ये जाणारा रस्ता व शहरातील सखल भागात नाल्या तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. शहरातील अनेक रस्ते गुडख्याभर पाण्यात गेल्याने चालत जाणाऱ्यांना कसरत करीत जावे लागले. मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातील पीके अपुऱ्या पावसामुळे वाया गेली होती. तर जलसाठ्यात ही पुरेसे पाणी नसल्याने अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. 


 
Top