धाराशिव (प्रतिनिधी)-धाडी टाकणे, पक्ष फोडणे, चिन्हासह पक्ष घेणे, भ्रष्ट लोकांना पक्षात घेवून क्लिन चीट देणे या सर्व प्रकाराकडे लोकांचे लक्ष होते. लोकशाहीमध्ये लोक हे सर्वोच्च असतात. अशा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे लोक आपली शक्ती दाखवतात. असे मत महाविकास आघाडीचे व शिवसेना ठाकरे गटाचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

खासदार की ही मिरवण्यासाठी नसते. लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांच्या मदतीला येणे यामुळेच लोक माझ्या पाठिशी राहिले आहेत. भाजपवाले प्रत्येक वेळेस मला मोदीच्या नावावर निवडून आल्याचे म्हणत नाव ठेवत होते. परंतु या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या विरोधात लढलो आहे. मी बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून महायुतीने पायउतार केले हे लोकांना अजिबात पटले नाही. त्याप्रमाणे शेतमाला भाव न देणे, आरक्षणाबाबत काहीही न बोलणे यामुळेच लोकांनी महायुतीच्या उमेदवारांचा दारूण पराभव केला आहे. 

 
Top