वाशी (प्रतिनिधी)- वाशी तालुक्याचे खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र 41711 हेक्टर असून, यापैकी 21679 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी पूर्ण झाली आहे. म्हणजेच खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या 52 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

एकंदर पर्जन्यमानाचा मागील व पुढील विचार करून यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. कारण तालुक्याचे सोयाबीन या खरिपातील पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 27300 हेक्टर आहे. प्रत्यक्षात 20729 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी 76 इतकी आहे. वाशी तालुक्याची पावसाची जूनची सर्वसाधारण सरासरी 75.2 असून 191.2 इतका पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाचे सर्वसाधारण प्रमाण 641.2 असून सरासरीच्या 29.8 % पाऊस झाला आहे. वाशी तालुक्यातील मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे: वाशी -139.6, पारगाव-212.9 आणि तेरखेडा-221.3 म्हणजेच सरासरी 191.3 पावसाचे प्रमाण आहे.


 
Top