सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. 14.05.2024  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील 2, भुसावळ विभागातील 1, नागपूर विभागातील 2, पुणे विभागातील 2 आणि सोलापूर विभागातील 1 अशा 11 मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कर्तव्य दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यात ट्रेन ऑपरेशनमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान या बद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रूपये 2000/- रोख असतात.

त्यापैकी सोलापूर विभागाच्या संतोष गाडेप्पा खंदारे, ट्रॅक मेंटेनर, बोरोटी यांना दि. 04.05.2024 रोजी डीयूडी-बीओटी विभागातील येथे गाडी क्र.केएम 508/9-10च्या वॅगनच्या चाकाला आग लागल्याचे निदर्शनास आले. अप बीजीके आणि ड्युटीवर असलेल्या स्टेशन मॅनेजर / बीओटीला माहिती दिली आणि बीओटी स्टेशनवर तपासणी दरम्यान हॉट एक्सल आढळले. त्यांची सतर्कता आणि कामाप्रती असलेली निष्ठा यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम. एस. उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस. एस. गुप्ता, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता सुनील कुमार, प्रधान मुख्य विद्युत अभियंता एन. पी. सिंह, प्रधान मुख्य सिग्नल धर्मवीर मीणा उपस्थित होते.

 

 
Top