तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून तालुक्यात  पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत.यात अनेक पाणीपुरवठा योजना अपुऱ्या आहेत. मात्र, काही ठिकाणी त्या योजनांचा लाभ मिळत नाही तर काही ठिकाणी शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना शुद्ध पाणी म्हणजे आरओ (रिव्हर्स ऑस्मोसिस ) अथवा जारच्या पाण्याचा याचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक फटका सोसावा लागत असल्याने सरकारच्या पाणी योजना कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या तालुक्यात पाणीटंचाई प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामीण नागरिकांना शुद्ध, नियमित, पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी

सरकारकडून पाणी योजना राबविल्या जातात. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. तर पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ पिण्यासाठी आरओ अथवा जारचे पाणी विकत घेतात. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चुनही विकतचे पाणी प्यावे लागत आहे. ही स्थिती ग्रामीण भागात सर्वत्र आहे. विहिरी, कूपनलिकांचे

पाणी पिल्याने आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी जारचेच पाणी मागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक झळ सोसावी लागते. सध्याही केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून का सुरू आहेत. त्यामुळे यंदा तालुक्यात  सद्यःस्थितीत टँकरची संख्या गतवर्षाच्या तुलनेत अधिक आहे. अनेक गावांत अनियमित, पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे  पिण्यासाठी नागरिक आरओ अथवा पाण्याचाच जारच्या वापर करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शुद्ध पाणी हे मृगजळच

ठरल्याचे दिसते.

नदी, तलाव यावर पाणी योजना राबविल्या गेल्या आहेत. सध्या सर्वञ शहरी ग्रामीण भागात तसेच शेतकऱ्यांना कामासाठी येणाऱया शेतमजुरांनाही जारचेच पाणी पुरवावे लागत आहे. कारण आरओ, जारच्याच पाण्याची सवय झाल्याने शेतमजूरही शेतातील विहिरी, बोअरचे पाणी पिणे टाळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही

आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तालुक्यात  झालेल्या जलजीवन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. हर घर जल योजनां हरघर जार बनली आहे. यंदा तालुक्यात  टँकरची संख्या वाढली आहे. केवळ 112 टैंकर सुरू आहेत.  शुद्ध पाण्याचा प्रश्न कायमच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही जारचा व्यवसाय

फोफावला आहे. आरओ बसवाव्या लागल्या आहेत. शिवाय जारचे पाणी विकण़ाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून

योजना राबवते तर दुसरीकडे पाणीपट्टी भरूनही नागरिकांना पिण्यासाठीचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

 
Top