तुळजापूर  (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर चे तापमान चाळीस अंशाचा वर पोहचल्याने या वाढत्या  तापमानाचा परिणाम शहरातील जनजीवनावर झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या दवाखान्यात उष्णते मुळे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

सध्या मे महिना चालू असून कडक ऊन व त्याची प्रचंड दाहकता अधिक जाणवत आहे. गेल्या आठ दिवसांत उष्णतेचा पारा वाढतच गेल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून सकाळी दहानंतर  मंदीर परिसर वगळता इतर भागातील रस्त्यावरील वर्रदळ घटत आहे. वाढत्या तापमानामुळे शेती कामांच्या वेळा ही बदलल्या आहेत. पहाटे व भल्या सकाळी आपल्या शेतातील कामे उरकून दुपारच्या वेळी झाडाखाली विसावा घेत आहेत.नंतर सांयकाळी शेतीचे कामे करीत आहेत. शहर व तालुक्यात भरणाऱ्या आठवडी बाजार व रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. या वाढत्या तापमानामुळे बाजारपेठांमधील व्यवहार थंडावलेले. दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याने दिसून येत आहेत. 

कडक उन्हामुळे भाजीपाला व फळबागा करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. नेहमी गर्दीने फुललेली शासकिय कार्यालय दुपार नंतर ओस पडत आहेत. दुपारी 

घराबाहेर निघण्याची हिंमत कोणीही करायला तयार नाही. उन्हाचा फटका शासकीय कामावरही झाल्याचे जाणवत आहे. सद्यस्थितीत शहराचे कमाल तापमान 40  अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 27 अंश सेल्सिअस असे राहत आहे. या वाढत्या तापमानामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे.


 
Top