तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा धाराशिव मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत दिव्यांग शिक्षकांनी शहरातील नगरपरिषद येथील  मध्यवर्ती  ठीकाणी असलेले मतदान केंद्र लोकशाही उत्सवात सक्षमपणे चालवले.

दिव्यांग कर्मचारी यांच्यासाठी नगरपरिषद अध्यक्षांचे दालन नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे दिव्यांगांसाठी केंद्र  तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सर्व दिव्यांग शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली होती. येथील बूथ क्रमांक 171 येथे  एकूण मतदान 1067 होते. यापैकी 673 मतदान झाले. मतदान प्रक्रिया सक्षमपणे यासाठी नेमलेले दिव्यांग शिक्षक केंद्रअध्यक्ष क्षीरसागर के.टी. (सहशिक्षक)महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर, मतदान अधिकारी हनुमंत सूर्यवंशी (जि.प. ढेकरी),  मर्डे विजयकुमार (जि. प. रामनगर वस्ती नळदुर्ग साखरे धनराज साने गुरुजी हायस्कूल केशेगाव पार पाडली. दिव्यांग शिक्षक बूथ क्रमांक 171 चालवत असल्याचे पाहुन मतदानासाठी आलेले मतदार त्यांचे अभिनंदन करीत होते.


 
Top