धाराशिव (प्रतिनिधी)- महाराणा प्रतापसिंह यांचे बालपण भिल्ल समाजासोबत गेले. त्यांच्यासोबतच ते युद्धकला शिकले. वडीलांच्या मृत्यू नंतर महाराणा प्रताप यांनी वयाच्या 32 व्या वर्षी मेवाडच्या राजघराण्याची गादी स्विकारली. राजपदावर बसल्यावर अतिशय पराक्रमाने व कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून महाराणा प्रताप यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. महाराणा प्रतापसिंह यांची राजपूतांचे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक समजले जाते. असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले.

चित्तोड रजपूत खिसाडी समाज व शिवप्रताप प्रतिष्ठान धाराशिव यांच्या वतीने आयोजित धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला हार पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिपक पवार, जयंती  उत्सव समितीचे अध्यक्ष विकी पवार, मिरवणूक प्रमुख प्रमुख मार्गदर्शक अक्षय साळुंखे, बारा बलुतेदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे, खिसाडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजोग पवार, लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले,अजय शेटे, इलियास मुजावर, गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष अभिजित गिरी, रामकृष्ण माने,सोमनाथ नवगिरे,नंदू कुर्हाडे, सुनिल पवार,संतोष डोंगरे,आकाश पवार,लखन पवार,राहुल पवार,तेजेश साळुंखे,अजय पवार,विनय पवार,विनय साळुंखे,शिवराज चव्हाण,श्री पवार,ओम पवार,अंकुश साळुंखे, आकाश चव्हाण,यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top