तुळजापूर (प्रतिनिधी) - उन्हाळा सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ प्रचंड गर्दी होत आहे. माञ वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नियोजन कोलमडत असल्याने भाविकांना हालहापेष्टा सहन करीत देवीदर्शन घ्यावे लागत आहे. या भाविकांच्या हालहापेष्टांची दखल विश्वस्त, लोकप्रतिनिधी घेणार का असा प्रश्न भाविकांमधुन केला जात आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असताना मुलभुत सोयी सुविधात वाढ होणे गरजे आहे. त्या वाढत नाहीत परिणामी याचा जबरदस्त फटका सर्वसामान्य वर्गातील भाविकांना बसत आहे. पण याची दखल घेण्यास ना प्रशासन ना राज्यकर्त्यांना वेळ नाही. निवडणुक संपल्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना परिस्थिती जैसे थे आहे. 

श्रीतुळजाभवानी सुलभ दर्शन न घडणे, अतिक्रमणीत रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, हातपाय धुणे व. स्नानासाठी प्रचंड वेळ रांगेत उभे राहावे,  अस्वछता, स्ञी शौचालय, स्वछतागृहांची कमतरता, महिला दागदागिने चोऱ्या प्रमाणात वाढ यासह असंख्य गैरसोयीना स्ञी शक्तीदेवता श्रीतुळजाभवानी दारी  भाविकांना सामोरे जावे लागत आहे. भाविकांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी. या गैरसोयीचा भाविकांबरोबरच पुजारी वृंदाना बसत आहे. मंगळवार, शुक्रवार, रविवार, पोर्णिमा या गर्दी दिनी नियोजन कोलमडणे नित्याचेच बनले आहे. यावर उपाययोजना माञ केली जात नसल्याने सर्वसामान्य वर्गातील भाविकांना देवीदर्शन घेताना हालहापेष्टा सहन कराव्या लागत आहे.

 
Top