धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यात विद्यार्थी संख्येमध्ये नंबर 2 वर असलेल्या श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयामधील विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आले असून, या विद्यार्थ्यांना धिरूभाई अंबानी स्कॉलरशीप मिळाली आहे. या स्कॉलरशीप मधून विद्यार्थ्यांचे मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा इतरत्र प्रवेश घेतल्यास त्यांचा पदवी पर्यतच्या खर्च ते उचलतात. कॉलेजला धिरूभाई अंबानी स्कॉलरशीप सलग मिळण्याचे हे दहावे वर्ष आहे अशी माहिती अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बुधवार दि. 22 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेस प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, केरल, राजस्थान, अलहाबाद, दिल्ली आदी राज्यातून प्राध्यापक कॉलेजमध्ये घेतले आहेत. आमच्या कॉलेजमध्ये ग्रामीण भागातून आलेले कटाळू विद्यार्थी आहेत. त्यामुळे कॉलेजचा निकाल 98.26 टक्के लागला आहे. धिरूभाई अंबानी स्कॉलरशीपचे मानकरी विज्ञान शाखेतील दिरगुळे प्रथमेश सिताराम, वाणिज्य शाखेतील तांबे रामदास लक्ष्मण, कला शाखेतील आहेर कोमल बाळासाहेब हे तिन्ही विद्यार्थी असून, धाराशिव जिल्ह्यात प्रथम आले आहेत. तर जीवशास्त्र व अकाऊंट विषयात आकांक्षा हुकुमशाह कानडे व सुरवसे नितीन बाळू हे विद्यार्थी राज्यात प्रथम आले आहेत. स्नेहल विजय पवार, ऋतुजा जयवंत साळुंके, वैष्णवी महादेव रोटे, रोहित ईश्वर लांडे, किर्ती प्रकाश मोरे, निकिता बाळासाहेब शिंदे, अमृता किरण तांबारे, कोमल बाळासाहेब आहेर हे विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे पालकांनी मुलांवर पण कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे असे मत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

 
Top