तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूरात यंदा पाणपोईचा दुष्काळ असताना मंदीर मार्गावर असणाऱ्या दीपक चौकात माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी थंडगार जारची पाणपोई चालु केली आहे. या पाणपोईचा मंगळवार दि. 21 मे रोजी दिवसभर हजारो भाविकांनी येथील पाणी पिवुन आपली तहान भागवली. दुपारी या पाणपोईवर प्रचंड गर्दी झाली होती. ही पाणपोई माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने चालु केली आहे. ती उन्हाळा संपेपर्यत चालु राहणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष  सचिन रोचकरीं यांनी दिली.

 
Top