धाराशिव (प्रतिनिधी)- हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरचं सरकार आहे अशी घणाघाती टिका शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केले.

तालुक्यातील येडशी, तडवळा (क), पळसप याठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार कैलास  पाटील, यांची सभा पार पडली. मतदार संघातील निधी संदर्भात आमदार कैलास पाटील यांनी खर्च झालेला निधी जनतेसमोर मांडला. विरोधकांना जाहीर आवाहन केले तुम्ही केलेले काम सांगा माझेही काम सांगतो. पाटील कुटुंबांन फक्त आपल्या परिवाराचा फक्त विकास केला. शेतकरी विरोधी या सरकारला येत्या 7 तारखेला मशाल या चिन्हावर शिक्कामोर्तब करून बहुमताने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना विजयी करा असे आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, धाराशिव तालुका प्रमुख सतिश सोमाणी, वागलास काळे,संग्राम देशमुख, रवि कोरे आळणीकर, प्रदिप नाना सस्ते, बाळासाहेब मेटे, विनोद पवार, सुनिल शेळके,संजय काका पाटील,दिलीप पवार,पमू पवार,अमर पवार,विष्णू पवार,शहाजी देशमुख,तडवळा येथे तानाजी जमाले,देवदत्त मोरे, तुळशीदास जमाले,चंदू आण्णा जमाले,राजाभाऊ लोंढे,विशाल जमाले,शंकरभाऊ होगले, दिलीप करंजकर, किशोरभाऊ ढाळे, काकासाहेब शिनगारे, मुश्रीफ मुजावर यांच्यासह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top