परंडा (प्रतिनिधी) - उच्च माध्यमिक (इ 12 वी ) बोर्ड  परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने बोर्डातर्फे जाहीर करण्यात आला. परंडा शहरातील शांतादेवी पाटील  (एस.पी ) ज्युनिअर कॉलेजचा निकाल याही वर्षी 100 टक्के लागला असून,सलग 5 व्या वर्षी 100 टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यामध्ये कॉलेजमधून  कु.अंजली सुरेश घाडगे -87.33 टक्के गुण  मिळवत पहिला क्रमांक पटकावला, तर  कु . ज्ञानेश्वरी संतोष गोफणे -85.83% गुण घेत दुसरा तर सुरज हनुमंत काळे याने 85.17 %गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सायली सतीश शिंदे -80.33%, गौरी महादेव हांडे -80.17%, प्रसाद धनंजय पाटील -79.67%, साक्षी सिद्वेश्वर गुडे -78.83%, अंजली अंबादास शिंदे -78.17%, प्रतीक्षा संजय ठवरे -77.67%, राजेश चंदनसिंह सल्ले -77.50%,आर्या सुनील  पाटील77.00%, प्रगती सोमनाथ पाडुळे -76.33%, हर्षवर्धन सचिन भांडे -76.17%गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण झाले. तर वैष्णवी विजयकुमार शिंदे -73.17%, पृथ्वीराज मधुकर सुरवसे -72.50%, पृथ्वीराज भारत मेहेर -72.00%, महेश महाजन कोलते -70.33%, कौसर हसन शेख -68.17 %गुण मिळवत प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व कर्मचारी यांचे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ.राहुल पाटील, सचिव डॉ. उदयसिंह पाटील, संस्थेच्या डायरेक्टर डॉ.शिल्पा पाटील व प्राचार्य संतोष भांडवलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 
Top