भूम (प्रतिनिधी)- राजकिय दबावाखाली जाऊन पोलिस प्रशासनाने घडलेल्या घटनेला वेगळेच वळण लावले असुन सदरील घटनेबाबत पाटील कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समाधान पाटील यांच्या कुटूंबाच्या पाठीशी उभे राहू असे आमदार कैलास पाटील यांनी मयत झालेल्या समाधान नानासाहेब पाटील यांच्या कुटुंबास भेट देऊन आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कैलास पाटील व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी मदतही केली आहे.

अधिक माहिती अशी की. दि. 7 मे रोजी मतदानादिवशी पाठसांगवी येथील बस स्थानक व मतदान केंद्राजवळ मयत समाधान नानासाहेब पाटील व जखमी असलेला शंकर शरद शिंदे पाटील यांच्यावर गौरव आप्पा नाईकनवरे या युवकांनी हल्ला केला. यामध्ये समाधान पाटील यांचा मृत्यू झाला. समाधान पाटील यांची राजकारणातून हत्या झाली असून, पोलिस मात्र राजकारणाचा काही संबंध नाही. वैयक्तिक कारणावरून हत्या झाली असे सांगत आहेत. त्यामुळे या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा प्रमुख रणजित पाटील, डॉ. चेतन बोराडे, दिलिप शाळू, ॲड. श्रीनिवास जाधवर, बुद्धीवान गोडगे, प्रल्हाद आडागळे,  सुधिर ढगे, सुभाष हातमोडे, काकासाहेब इंदलकर, गणपत डोळस, समाधान नाईकनवरे, बाबा नायकिंदे, आल्ली पठाण, सुभाष हातमोडे, भागवत नायकिंदे, अशोक वनवे उपस्थित होते.


 
Top