सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे - भुवनेश्वर- पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

गाडी क्र. 01047/01048 पुणे - भुवनेश्वर- पुणे सुपर फास्ट  विशेष एक्सप्रेस

गाडी क्र. 01047 पुणे - भुवनेश्वर फास्ट  विशेष एक्सप्रेस दि. 11.05.2024 शनिवारी सकाळी 11.30  वाजता पुणे येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी  04.45 वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल. 

गाडी क्र. 01048 भुवनेश्वर-पुणे फास्ट  विशेष एक्सप्रेस दि. 12.05.2024 रविवारी रात्री  09.25 वाजता भुवनेश्वर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी  05.30 वाजता पुणे येथे पोहोचेल.

थांबे- दौंड, कुर्डूवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, सिकंदराबाद, नलगोंडा, गुंटूर, विजयवाडा जं, दुव्वाडा, विशाखापट्टनम, भीमसेन, बहरामपूर आणि  खुर्दा रोड जं.

संरचना- दोन तृतीय श्रेणी वातानुकूलित, 18 शयनयान यासह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन. (22 डब्बे) 

गाडी क्र. 01049/01050 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपर फास्ट  विशेष एक्सप्रेस. 

गाडी क्र. 01049 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  - भुवनेश्वर फास्ट  विशेष एक्सप्रेस दि. 11.05.2024 शनिवारी सकाळी 11.05  वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री   01.45 वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल.

गाडी क्र. 01050 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  फास्ट विशेष एक्सप्रेस दि. 13.05.2024 सोमवारी रात्री 11.00 वाजता भुवनेश्वर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी    12.15  वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. 

थांबे- दादर,  ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, विजयवाड़ा जं, राजमुंदरी, सामलकोट जं. पिठापुरम, दुव्वाडा, भीमसेन, बहरामपूर, आणि खुर्दा रोड जं.

संरचना- एक प्रथम श्रेणी वातानुकूलित,  एक श्रेणी द्वितीय वातानुकूलित, चार श्रेणी तृतीय वातानुकूलित, 7 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन. (22 डब्बे).

आरक्षण- ट्रेन क्रमांक 01047आणि 01049 च्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया   www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.  प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


 
Top