तुळजापूर (प्रतिनिधी)-तिर्थक्षेञ तुळजापूर  येथे महाविकास आघाडी उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते चक्क हातात पेटती मशाल घेऊन दारोदार जावुन प्रचार करीत असल्याने प्रचाराचा हा अनोखा फंडा लक्ष वेधुन घेत आहे. यामुळे तिर्थक्षेञी गल्लोगल्ली चक्क पेटत्या मशाली ! हे गीत कानी पडत आहे.

तुळजापूर तालुक्यात महायुती, महाविकास आघाडी मध्ये अखेरचा टप्यात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. महायुतीने स्ञी शक्ती देवता नगरीत महिलांची भव्य रँली काढुन प्रचार केला. याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीचे पदाधिकारी सध्या हाती पेटती मशाल घेऊन दारोदार फिरत आहेत. त्यामुळे शहरात सांयकाळी गल्लोगल्ली पेटलेल्या मशाली दिसत आहे. हा प्रचाराचा अनोखा फंडा प्रचारात बाजी मारुन जात आहे. या प्रचारात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), शेकाप, आम आदमी पार्टी सह मिञपक्ष पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होत आहेत.


 
Top