तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी व त्यांच्या सौभाग्यवती संपदा प्रतिष्ठान अध्यक्षा मीरा श्रीकृष्ण सुर्यवंशी आपल्या दोन मुलांसह तुळजापूर शहरात घरोघर फिरून महायुती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ घरोघर फिरुन अर्चनाताई पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. यात सुर्यवंशी परिवारातील पती श्रीकृष्ण, पत्नी मीरा व त्यांचा मुलगा हर्षवर्धन, मुलगी संपदा सकाळी प्रचारासाठी घराबाहेर पडुन सांयकाळी घरी येत आहे.


 
Top