धाराशिव (प्रतिनिधी)- बीदर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी शनिवारी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मुरूम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान पार पडलेल्या लोकसभा निवडणुकींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बीदर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसेच भेटीदरम्यान संघटात्मक चर्चा करण्यात आली. 

तत्पूर्वी मंत्र्याचे स्वागत धाराशिव मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांनी केले. यावेळी भारतीय जनता पार्टी बीदर सरचिटणीस मल्लिकार्जुन कुंभार, जेष्ठ नेते आण्णप्पा खानापुरे, बी.वी.मोतीपवळे, विठ्ठलराव बदोले, विनय बदोले, देवेंद्र कंटेकुरे, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top