धाराशिव (प्रतिनिधी) - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुषंगाने 40 - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी मतदान झाले.सर्व विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम - व्हीव्ही पॅट मशीन्स शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व गणना प्रतिनिधी यांना मोबाईल (भ्रमनध्वनी) किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेवून येण्यास सक्त मनाई आहे. 40 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व गणना प्रतिनिधी यांनी याची नोंद घ्यावी. असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कळविले आहे.
प्रत्येक विधानसभा केंद्रासाठी 14 टेबल
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रातील मतमोजणीकरिता 14 टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, शिपाई, सुक्ष्म निरीक्षक असणार आहे.