परंडा (प्रतिनिधी) - परंडा शहरासह परिसरात बुधवार दि.22 रोजी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे परंडा शहराला पाणीपुरवठा करणारी विजेची लाईन तुटली आहे. या लाईनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

परंडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 11 केव्ही लाईनचे पोल दुपारी झालेल्या अवकाळी व वादळामुळे वाकले आहेत. या लाईनच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

तसेच दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील भोत्रा येथे वादळात वीज पडून शंकर पारेकर यांच्या बैलावर वीज पडून ठार झाल्याने सुमारे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच भोत्रा व परिसरात जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडले असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   


 
Top