धाराशिव (प्रतिनिधी)-रूपामाता उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक अँड.अजित व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस संस्थेच्या मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला.

रुपामाता उद्योग समुहाने जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना नौकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून 'रुपामाता' सामाजिक बांधिलकी जपत आहे. मुख्य कार्यालयात झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गुंड यांनी जिल्ह्यातील शेतकरी व युवकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी रूपामाता मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद खांडेकर, रूपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण बोधले, सरव्यवस्थापक विजयकुमार खडके, प्रशासकीय अधिकारी विशाल गुंड, रूपामाता मल्टीस्टेटचे प्रशासकीय अधिकारी नितिन मुदगल, सागर खोत,गजानन पाटील, तुषार पाटील, हर्षल मोहीते पदाधिकारी, कर्मचारी, खातेदार इ.मान्यवर उपस्थित होते.


 
Top