धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक 31 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत. तर लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत 1951 मध्ये 2 उमेदवारांमध्येच लढत झाली. तर 1957 च्या लोकसभा निवडणुकीतपण 2 उमेदवारांमध्येच लढत झाली होती. 

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 14 उमेदवार, सन 2014 च्या निवडणूकीत 27 उमेदवार, सन 2009 च्या निवडणूकीत 25 उमेदवार, सन 2004 मध्ये 8 उमेदवार, सन 1999 मध्ये 5 उमेदवार, सन 1998 मध्ये 7 उमेदवार, सन 1996 मध्ये 21 उमेदवार, सन 1991 मध्ये 17 उमेदवार, सन 1989 मध्ये 12 उमेदवार, सन 1984 मध्ये 6 उमेदवार, सन 1980 मध्ये 5 उमेदवार, सन 1977 मध्ये 3 उमेदवार, सन 1971 मध्ये 5 उमेदवार, सन 1967 मध्ये 3 उमेदवार, सन 1962 मध्ये 3 उमेदवार, सन 1957 मध्ये 2 उमेदवार, सन 1951-52 च्या सार्वत्रिक निवडणूकीत 2 उमेदवारांत लढत झाली. येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

7 मे रोजी झालेल्या निवडणूकीसाठी 10 लक्ष 52 हजार 96 पुरुष, 9 लक्ष 40 हजार 560 स्त्री आणि 81 तृतीयपंथी असे एकूण 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांचा मतदार यादीत समावेश आहे. त्यापैकी 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री व 20 तृतीयपंथी मतदार अशा एकूण 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा या निवडणूकीत हक्क बजावला. यामध्ये 65.63 टक्के पुरुष, 61.92 टक्के स्त्री व 24.69 टक्के तृतीयपंथी अशा एकूण 63.88 टक्के मतदारांनी मतदान केले.


 
Top