धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील आंबेजवलगे पंचक्रोशीत सकल मराठा समाजाची दि.30 मे रोजी बैठक संपन्न झाली. मराठा समाजाच्या बैठकीसाठी पंचक्रोशीतील पाच गावातील सकल मराठा बांधव उपस्थित होते. शेकडो बांधवांनी लावली हजेरी. बैठकीमध्ये 4 जूनला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि पुढील दिशा ठरण्याच्या हेतुने संदर्भात ही बैठक घेतली होती. बैठकीमध्ये सोनेगाव, भानसगाव, कारी, कौडगाव, आंबेजवळगे, घाटंग्री इत्यादी ठिकाणचे मराठा बांधव उपस्थित होते. मराठा समाजात असलेली एकी ही आपण कायम राखून. आपण जास्तीत जास्त संख्येने दि.4 जुन अंतरवली सराटीकडे जाणार आहोत. आपल्या समाजात असलेला आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही. तोपर्यंत मराठा समाज एकजुटीने राहील. सगळेचा जोपर्यंत निर्णय पारित होत नाही आणि मनोज जरांगे पाटील जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लढा चालू ठेवतील. तोपर्यंत आपण ही मराठा समाजाने एकत्र राहून समाजासाठी काम करत राहिला पाहिजे.  तसेच आंबेजवळगे मधील ग्रामस्थ बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top