उमरगा (प्रतिनिधी)- महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुरुवारी,(दि 30) धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने निषेध करण्यात आला. यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महाड येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून देशवासियांच्या तसेच आंबेडकर प्रेमीच्या भावना दुखावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी आव्हाड यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी युवक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, शमशोदीन जमादार, बाबा पवार, शंतनू सगर, रणजीत गायकवाड, अनिल व्हंताळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 
Top