कळंब (प्रतिनिधी)- भ्रष्ट पध्दतीने पैसा कमविणारे आमच्यावर टिका करत आहेत. स्वतः शेण खाऊन दुसऱ्यावर बोलणाऱ्यांनी अँम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा करुन शेण कोणी खाल्ले याचे उत्तर द्यावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे. शिराढोण (ता.कळंब) येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार ओमराजे म्हणाले की, भ्रष्टाचाराने बरबटलेली मंडळी आपल्या पक्षात घेऊन त्याना शुध्द करण्याचे काम भाजपा करत आहे. पहिल्यांदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व नंतर त्यानाच आपल्या पक्षात घ्यायचे. असली वॉशिंग मशीन असल्यामुळे भ्रष्ट लोकाची भाजपमध्ये गर्दी झाली. त्यामुळे मुळ भाजपची लोक देखील या प्रकारामुळे नाराज झाल्याचे दिसत आहे. काहीजण उठुन आमच्यावर बोलत आहेत. स्वतःची स्थिती काय होती. एवढा सगळा पैसा कसा मिळविला व त्याचा माज जनतेलाच दाखवायचा असा प्रकार सहन केला जाणार नाही असाही इशारा ओमराजे यांनी यावेळी दिला. आम्हाला विरोधक कमीशनचे आरोप आमच्यावर केले आहेत. त्याना उत्तर देताना ओमराजे म्हणाले की, आम्ही भ्रष्ट मार्गाने पैसा कमविला असता तर आम्हालाही तुमच्यासारखे भाजपच्या वळचणीला जाऊन शुध्द होण्याची आवश्यकता भासली असती. आम्ही प्रामाणिक असल्यामुळे कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही केलेले एक कारनामे बाहेर काढले तर तुम्हाला तोंड दाखविता येणार नसल्याचाही टोला ओमराजे यानी लगावला. अँम्बुलन्स खरेदीमध्ये हजारो कोटीचा घोटाळा करुन कोणी शेण खाल्ले याचे उत्तर द्यावे असे आव्हान ओमराजे यांनी दिले आहे.


 
Top