धाराशिव (प्रतिनिधी)- खोके पेटीच्या काळात मंगरूळ ता.तुळजापूर येथील ज्ञानेश्वरी मनोज डोंगरे हिने चिंचा फोडून स्व-कष्टाने एक हजार 600 रुपयाची रोख मदत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना देऊ केली आहे. ओमराजे यांच्या मातोश्री आनंदीदेवी यांच्याकडे ही रक्कम सुपुर्त केली. ओमराजे यांनी त्या मुलीचे आभार मानले व तुझा हा भाऊ तुला कधीच विसरणार नसल्याचे सांगितले.

सध्याच्या युगात जिथे राजकारणाचा विचका झाला आहे. बहुतांश राजकारणी लोकांना शिव्या देत आहेत. अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी ओमराजेंना मदतीचा ओघ सूरु झाला असुन दौऱ्यादरम्यान लोकांचं प्रेम, आपुलकी बघून ओमराजेंना कृतकृत्य झाल्याची जाणीव झाल्याचे ते म्हणतात. अनेक सामान्य नागरिक जे स्वतः आर्थिक रित्या दुर्बल आहेत असे लोक स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी आर्थिक मदत घेऊन पुढे येत आहे. त्यांच्या मदतीची रक्कम ही करोडो रुपयांना भारी असल्याचेही मत ओमराजे यांनी व्यक्त केले आहे. गद्दारीचा परिणाम लोकांमध्ये किती मोठ्या प्रमाणात झाला आहे याचे हे अत्यंत बोलक उदाहरण आहे. मी निष्टावंत राहिल्यामुळे जनतेच्या प्रेमात भर पडली आहे. या अगोदरही मी अनेक निवडणुका सामोरे गेलो पण पैशाच्या स्वरुपात मिळणारे हे प्रेम याचवेळी मिळत असल्याने त्यातुनच गद्दारांना जनतेने दिलेला हा संदेश आहे.


 
Top