धाराशिव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर  यांच्या प्रचारार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची धाराशिव येथे (ता. 4) रोजी जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता धाराशिव शहरातील मल्टिपर्पज कन्या प्रशालेच्या मैदानावर प्रचार सभा होणार आहे.

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले होते. त्यासाठी उध्दव ठाकरे यांनी 4 मे रोजीची वेळ दिली असुन त्या दिवशी प्रचार संपण्याच्या पुर्वसंध्येला त्याची तोफ धाराशिवमध्ये धडाडणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या सभेनेच विजयाची मुहुर्तमेढ रोवली जाणार असल्याचा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. उध्दव ठाकरे यांची सभा म्हणजे आमच्या शिवसैनिकांसाठी एक उर्जा असते. ही उर्जा घेण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होते. शिवसैनिकांनी या सभेला हजर रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी केले आहे.


 
Top