धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव लोकसभेसाठी सकाळी 1 ते सांयकाळी 6 या वेळेत 63.82 टक्के मतदान झाले असल्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. 19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 72 हजार 754 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. त्यात 6 लाख 90 हजार 380 पुरूष मतदार व 5 लाख 82 हजार 354 महिला मतदार तर 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरूष मतदार टक्केवारी 65. 53 टक्के तर महिला मतदार टक्केवारी 61.91 टक्के इतकी राहिली. मतदानाच्या टक्केवारीत महिलांपेक्षा पुरूषांची टक्केवारी अधिक आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 47 हजार 627 मतदान झाले. त्यापाठोपाठ धाराशिव लोकसभा मतदार संघात 2 लाख 33 हजार 935 मतदान झाले. त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 69 हजार 922 इतके मतदान जास्त झाले. त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे. 2019 च्या निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले. त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना 4 लाख 63 हजार 74 इतके मतदान मिळाले होते. ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे यांना 49.5 तर राणा पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली. 

2024 लोकसभा निवडणुकीत औसा 64.44 टक्के, उमरगा 60.30 टक्के, तुळजापूर 65.40 टक्के, धाराशिव 63.93 टक्के, परंडा 63.53 टक्के तर बार्शी 65.29 टक्के मतदान झाले. औसा विधानसभा मतदार संघात 2 लाख 94 हजार 86 पैकी 1 लाख 89 हजार 515 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. उमरगा विधानसभा मतदार संघात 3 लाख 10 हजार 703 पैकी 1 लाख 87 हजार 54 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 75 हजार 562 पैकी 2 लाख 54 हजा 627 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 3 लाख 65 हजार 951 पैकी 2 लाख 33 हजार 935 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. परंडा विधानसभा मतदार संघात 3 लाख 25 हजार 165 पैकी 2 लाख 6 हजार 578 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बार्शी विधानसभा मतदार संघात 3 लाख 21 हजार 270 पैकी 2 लाख 9 हजार 753 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 


 
Top