तुळजापूर (प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विविध समाजांच्या गुप्त बैठक संपन्न होत आहेत. सोशल मिडीया इतकेच हे माध्यम प्रचारात महत्त्व पुर्ण भूमिका ठरण्याची शक्यता राजकिय वर्तुळातुन व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जातीसह पोटजाती बाबतीत उमेदवारांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

या बैठकांमध्ये पक्ष उमेदवारांनी आपल्या समाजाला काय दिले. आपल्या समाजातील नेत्यांना निवडणुक सह अन्य क्षेत्रात किती महत्त्व स्थान दिले. आपल्या समाजाला किती साथ दिली. यासह इतर कुण्या समाजाचा नेत्यांना जवळ करुन राजकिय पाठबळ देवुन मोठे केले. ठेके कुणाला दिली. आपल्या समाजाला न्याय दिला कि अन्य समाजाला न्याय दिला. यावर साधक बाधक चर्चा होवुन या निवडणुकीत कुणाच्या पाठीशी राहायाचे यावर सखोल चर्चा होवुन निर्णय घेतला गेल्याचे समजते. त्यामुळे  आता ख-या प्रचाराला सुरुवात झाल्याचे समजते.

या बैठकीत अनेक दुखावलेले नेते सहभागी झाल्याचे समजते. यात अनेक जातीसह पोटजाती, विविध धर्म, पंथ यांच्या बैठक झाला. या गुप्त बैठकीचा मागमुस कुणालाही लागु दिला नसल्याचे समजते. या बैठकीला पक्ष समर्थक टाळले गेले असुन समाजात ज्यांचा शब्दाला मान आहे. असेच मोजकेच मंडळी निमंञित होते असे.

तुळजापूर शहरासह अनेक गावात अशा गुप्त बैठक झाल्या असुन काही आणखी होणार असल्याचे समजते. एकंदरीत मराठा, ओबीसी आंदोलन पार्श्वभूमीवर जात फँक्टरचा बोलबोला वाढला असल्याचे दिसुन येते. आता मतदार प्रथम जात नंतर देश याला प्राथमिकता देत असल्याचे दिसुन येते. शहरात मराठा समाजाचा एका जातीने नुकतीच गुप्त बैठक घेतली. पण कुणाला मतदान करायचा निर्णय घेतला हे कळु शकले नाही. या बैठकांवर नेत्यांचे विजयाचे बरेच गणित अवलंबून असते. जो जातीचे गणित व्यवस्थेत जमवुन घेईल त्याचा विजयाचा मार्ग सुकर राहण्याची शक्यता आहे.

तुळजापूर शहराच्या मतदारांचा अनुभव पाहता गुप्तचर खात्याला मतदारांची भनक लागली नव्हती. निवडणुक निकालानंतर माञ गुप्तचर विभाग ही आश्चर्य चकीत होवुन असे झालच कसे अशा प्रतिक्रिया पञकारांजवळ व्यक्त करीत होते.


 
Top