धाराशिव (प्रतिनिधी)-महात्मा बसवेश्वर हे 12 व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभाव विरोधी, जातीभेदा विरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी केले.

धाराशिव शहरात जगतज्योती, कर्मयोगी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.

याप्रसंगी धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, अक्षय ढोबळे, रामेश्वर शेटे,अजय शेटे, माळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुराव माळी,सतिश हिंगमिरे,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय शेरकर,सुरेश गवळी, राजाभाऊ माळी,किरण शेटे,ऋषीकेश चपने, समाधान भोरे,महेश उपासे,सुमित शेटे,सार्थक बेंद्रे,अमित शेरकर, ओंकार शेरकर,नवनाथ शेरकर,नागेश निर्मळे,अमोल आग्रे,अर्जुन साखरे,अमित शेरकर,नितिन लगदिवे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top