भूम (प्रतिनिधी)- हलगटाचे देवकार्य असल्याची बतावणी करत घरी येवून मुलीची मागणी केली. मुलगी न दिल्याचा रागातून 7 आरोपीनी एकावर तलवारीने वार करत मनगटापासून हात कलम केला. या प्रकरणातील आरोपीला पंधरा दिवस होऊन गेले तरी अद्याप अटक करण्यात आले नाही. तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी ज्योती अशोक भोसले यांनी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्यासह वरिष्ठानकडे केली आहे. 

अधिक माहिती की, तक्रारदार ज्योती अशोक भोसले व त्यांचे दीर सतीश नवनाथ भोसले राहणार तिंत्रज  हे घरी असताना अशोक बाळू पवार, प्रियंका बाळू पवार, पुष्पा बाळू पवार राहणार बाहेगव्हाण, तालुका जामखेड, सर्वेश गोवर्धन काळे, शहाबाई सर्वेश काळे राहणार चिंचपूर बुद्रुक, तालुका परांडा व मदिर उर्फ सुधीर सभापती काळे राहणार झरा, तालुका करमाळा हे सर्वजण हलगटाचे देवकार्य करायचे असल्याकारणाने पैशाची करण्याची बतावणी करून सतीश नवनाथ भोसले यांचे घरात आले.

यावेळी त्यांनी सतीश भोसले यांना तुझी मुलगी साक्षी सतीश भोसले वय वर्ष नऊ ही आम्हाला पाहिजे.  तुझी पोरगी आम्हाला दे अशी मागणी केली.  सतीश भोसले यांनी मुलीस देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी रागाच्या भरात सतीश नवनाथ भोसले यांच्यावर पाठीवर, हातावर, मानेवर जोरात तलवारीचे वार केले. यामध्ये सतीश भोसले यांचा डावा हात मनगटापासून कायमस्वरूपी कलम झाला. या प्रकरणाची फिर्याद 26 एप्रिल 2024 रोजी आंबी तालुका भूम या पोलीस स्टेशनला दिले. या संदर्भाने तक्रार नोंद झाली. तक्रार नोंद होऊन पंधरा दिवस झाले तरी अद्यापि पोलिसांनी एकाही आरोपीला अद्याप पर्यंत अटक केली नाही. यामुळे तक्रारदाराच्या जीविकास धोका निर्माण झाला आहे.  यामुळे तात्काळ सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार ज्योती अशोक भोसले, सतीश नवनाथ भोसले यांनी पोलीस उपअधीक्षक भूम, पोलीस अधीक्षक धाराशिव यांच्यासह वरिष्ठांकडे केली आहे.


 
Top