धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील आळणी येथे आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार व विधिवत पुजा करून जयंती उत्साहात साजरी केली. आज अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर महादेव मंदिर आळणी शिखर उभारी शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. 

याप्रसंगी हरिदास आबा म्हेत्रे,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, सोपान काका कोरे, सरपंच प्रमोद वीर, सुनिल माळी, संतोष चौगुले, अनंत खोबरे, मधुकर कोरे, नारायण कोरे, नेताजी कोरे, लहू तोडकर, शिवदास चौगुले, प्रशांत म्हेत्रे, शुभम म्हेत्रे, प्रविण कोरे, सागर माळी, दत्ता कोरे, भारत माळी, पांडुरंग माळी, लक्ष्मण माळी, दगडू कुदळे यांच्यासह समाज बांधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top