धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक महोत्सव रायगडावर साजरा करणेचे नियोजन करण्यात बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक धाराशिव येथे पार पडली. 

या बैठकीमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य व शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने शिवभूमी दूर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करणे बाबत नियोजन करण्यात आलेले आहे. रायगडावर साजऱ्या होणाऱ्या या शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासाठी एकूण 40 कमिट्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचेकडे अतिशय महत्त्वाच्या अशा तीन कमिट्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. स्वच्छता कमिटी भोजन कमिटी व नियोजन कमिटी यांचे संपूर्ण नियोजन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्याकडे देण्यात आलेले आहे.रायगडावरील संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था करण्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे स्वयंसेवक दिनांक 2 जून रोजी रायगडाकडे रवाना होणार आहेत.  यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष शशिकांत खुने यांचे अध्यक्षतेखाली शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष  गौरव बागल, उपाध्यक्ष आकाश कोकाटे, सचिव  अमोल पवार, शहराध्यक्ष मंगेश निंबाळकर, उपाध्यक्ष आकाश भोसले, शुभम लोकरे, अमोल सिरसट, वेंकट कोळी, दत्तात्रय जावळे, मनोज जाधव, अजिंक्य तनमोर, योगेश आतकरे, धनंजय साळुंके, दत्ता साळुंके, सुनील मिसाळ, बालाजी खोचरे, गणेश पवार, अतुल मते, विनोद चोबे, बालाजी पवार यांचे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top