धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला पोश्टर फाडून भीम अनुयायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिवच्या वतीने निषेध आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्टंटबाजी करत असताना महामानव  भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला पोश्टर फाडला. त्यामुळे संपूर्ण भारतातील दलित भीम अनुयायांचा अपमान केला. दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेल द्वारे तसेच जिल्हाधिकारी धाराशिव,  पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन धाराशिव यांना पदाधिकारी यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान असून संपूर्ण भारतातील दलित समाजाचे अस्मिता असून आमच्या अस्मितेला प्रतिमेला ठेच पोहोचली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, अवमान कोणीही सहन करणार नाही, त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला. तसेच धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन करून त्यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष लतीफ पटेल, सा.न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,सा.न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, आदिवासी सेल वाशी तालुकाध्यक्ष विशाल काळे,धाराशिव युवक तालुका कार्याध्यक्ष वैभव मोरे,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,धाराशिव युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, कामगार आघाडी शहराध्यक्ष प्रमोद हावळे,सौरभ देशमुख, शिरसाट प्रदीप, नाना शिंदे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते.

 
Top