धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा येथील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकून चार टन गोमांस व 45 गोवंशीय जिवंत वासरे, व दोन वाहने असा एकूण 21 लाख 35 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील दर्गा परिसरात अवैध कत्तलखान्यावर गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करण्यासाइी घेवून जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसा परंडा पोलिस पथकाने गुरूवारी दि. 9 मे रोजी छापा टाकून चार टन गोमांस, 45 गोवंशीय वासरे व दोन वाहने असा एकूण 21 लाख 35 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. या गुन्ह्यात दोन महिंद्रा पिकअप, 45 गोवंशीय जीवंत वासरे आणि गोवंशाचे चार हजार किलो मांस, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल फिरोज शेख यांच्या फिर्यादीवरून आरिफ मोमीन, अरबाज शेख, मोमीन कुरेशी, मुजमील शेख आदी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार तपास करीत आहेत. ही कारवाई 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस हावलदार शेख, पोलीस नाईक गुंडाळे, भांगे, पोलीस अंमलदार यादव यांचे पथकांनी केली आहे.


 
Top