धाराशिव (प्रतिनिधी) - येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिव या संघटनेच्या वतीने आयोजित सामुदायीक उपनयन संस्कार सोहळा सोमवार, 29 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. यावेळी 24 बटूवर उपनयन संस्कार करण्यात आले.  

येथील ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिव या संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून मागील सहा वर्षापासून सामुदायीक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या ही वर्षी येथील पुष्पक मंगल कार्यालयात सोमवार, 29 एप्रिल रोजी 24 बटुवर वेदशास्त्र संपन्न पुरोहितांच्या उपस्थित उपनयन संस्कार करण्यात आले.  

बटूंना आर्शिवाद देण्यासाठी माजी नगराध्यक्ष उर्मिला गजेंद्रगडकर, खासदार ओमप्रकाश राजेिंनबाळकर, आमदार वैलास घाडगे - पाटील, आमदार विक्रम काळे, तसेच भाजपचे आमदार राणाजगजितिंसह पाटील यांचे चिरंजीव मेघ राणाजगजितिंसह पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेिंनबाळकर, धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद जोशी, जिल्हा व्यापारी महासंघ व संस्कार भारतीचे प्रतिनिधीसह विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये धाराशिव शहरातील वेदशास्त्र संपन्न असलेले 20 पुरोहितांनी 24 बटूंवर सर्व विधीवत संस्कार केले, तसेच धाराशिव शहरातील वेदपाठ शाळेमधील 10 विद्यार्थी व सर्व पुरोहितांनी बटूंना चारी वेदांच्या मंत्रांचे आशीर्वाद दिले. हा उपनयन संस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.


 
Top