तुळजापूर (प्रतिनिधी) - लग्नसराई  पार्श्वभूमीवर रविवार  दि. 5 मे रोजी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ नवविवाहीत नवदांम्पत्यांन सह वावर याञेसाठी प्रचंड गर्दी केली होती. आज तिर्थक्षेञ तुळजापूरचे तापमान 40 अंशावर गेल्याने नवविवाहीत नवदांम्पत्यासह भाविकांनी असाह्य उकाड्यात घामाचा धारेत दर्शन घेतले.

हिंदूधर्मीयांमध्ये विवाह झाला कि कुलदैवतांची कुलधर्म कुलाचार करण्याची प्रथापरंपरा आहे. ती आजही देशात पाळली जाते. शुक्रवारी कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीचे दीड लाखाचा आसपास भाविकांनी देवीदर्शन घेतले. शुक्रवार रोजी पाच हजारच्या आसपास नवविवाहीत नवदांम्पत्यांनी तिर्थक्षेञी तुळजापूरात येवुन श्रीतुळजाभवानी मातेचा वावर याञेचा कुलधर्म कुलाचार करुन आपल्या भावी संसारी आयुष्यास आरंभ केला.

या नवदांम्पत्यांमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा राज्यातील नवविवाहीत नवदांम्पत्यांचा समावेश होता. नवाविवाहीत नवदांम्पत्य खाजगी वाहनांनी आल्याने आज शहरातील वाहनतळे, रस्ते वाहनांनी भरुन गेले होते. हे नवदांम्पत्य आपआपल्या पारंपारिक पुजारी वृंदाकडे जावुन प्रथमता श्रीकल्लोळ गोमुख, तिर्थकुंडात स्नान करुन मग रांगेने श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ जावुन भोगी पुजा, साडी चोळी, पंचामृत अभिषेक पुजा सह गोंधळ, नैवद्य आदी वावरयाञेचे धार्मिक विधी करीत होते. नंतर बाजारपेठेत जावुन प्रसाद साहित्य, मुर्ती फोटो खरेदीसाठी गर्दी करीत असल्यामुळे दुपार नंतर बाजारपेठ भाविकांनी फुलुन गेली होती. 


 
Top