धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशनने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लेजर रण अजिंक्यपद स्पर्धेत योगिनी साळुंके हिने सहभाग घेऊन नवीन राष्ट्रीय विक्रम केला. दिनांक 7 ते 10 जून दरम्यान चीन येथे होणाऱ्या वर्ल्ड अजिंक्यपद लेजर रण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. योगिनी साळुंखे ही मराठवाड्यातील मॉडर्न पेंटॅथलॉन खेळाची निवड होणारी पहिली महिला खेळाडू आहे. 

योगिनी व तिचे आई वडील व प्रशिक्षक योगेश थोरबोले व ज्ञानेश्वर भुतेकर यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त संजय देशमुख, कार्यालय अधीक्षक राजेश भवाळयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत नागेश राजुरे, हँडबॉलचे प्रशिक्षक तथा पोलीस दलात कार्यरत गुरुनाथ माळी, जिल्हा हँडबॉलचे सचिव कुलदीप सावंत, इंजिनीयर अनिल भोसले इत्यादी उपस्थित होते. सर्वांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top