कळंब / प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील साठे नगरमधील एक युवक गेल्या अनेक दिवसांपासून समाजामध्ये दररोज दारु पिऊन येऊन अश्लिल भाषेचा वापर करुन समाजातील महिलां समोर शिविगाळ करत असल्यामुळे समाजबांधव त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दि.१५ मे रोजी शिराढोण पोलिस ठाण्याला विनंती अर्ज करुन सबंधीतावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, संबंधीत युवक दररोज दारु पिऊन दिवसभर समाजातील पुरुष, महीला, यांना नाव न घेता अश्लिल भाषेत शिवीगाळ करतो. तसेच त्याला कोणी विचारलें तर मी तुमचे नाव घेतले का? असे उलट विचारतो, तसेच माझ्याकडे भरपुर पैसे आहेत मी एखाद्याला खल्लास करुन टाकेन अशीही धमकी देतो. तुम्हाला माझ्या विरोधात काय करायचे ते करा माझे कोणी काही करु शकत नाही असे बोलत आहे. तसेच गावामध्ये सार्वजनिक चौकातही गोंधळ घालतो आहे. कोणी त्याला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर ॲट्रॉसिटी करेन अशी ही धमकी देत आहे. त्याच्याकडे मोटारसायकल असुन तो दारु पिऊन फुल रेस करुन गावांमध्ये दहशत करतो आहे, तसेच समाजामध्ये बोअर वेल पाडलेली असुन कधी नादुरुस्त झाल्यास तो सार्वजनिक पट्टी देत नाही व मला कोणी विचारलें तर मी बोअरवेलमध्ये दगड टाकून बोअरवेल बंद करुन टाकेन अशी धमकी देत असल्याने समाजबांधवांनी शिराढोण पोलिस ठाण्याला त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला आहे. सदरील अर्जावर हनुमंत पाटुळे,आबाराव पाटुळे,श्रावण पाटुळे, विकास पाटुळे, मिटु पाटुळे, रामा पाटुळे, बाबासाहेब पाटुळे, नवनाथ पाटुळे, आदेश पाटुळे,सौ.उषा पाटुळे, लक्ष्मी पाटुळे, रेश्मा पाटुळे, नंदुबाई पाटुळे, आशा पाटुळे, अनिता पाटुळे, कौशल्या पाटुळे, छाया पाटुळे, लक्ष्मी देडे, सारीका पाटुळे यांच्या स्वाक्षरी आहेत.  

 
Top