तुळजापूर - शहरातील  तुळजाभवानी मंदिर परिसरातील धोकादायक  व अनाधिकृत होर्डींग व बॅनर नगरपरिषद ने काढुन टाकले.मुंबई येथील होर्डींग्ज दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र होर्डींग्जचा विषय चर्चेचा बनला होता. या प्रकरणी तुळजापूर नगर परिषदने चार जणांना नोटीसा बजावला होत्या. त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील नगर परिषद  शॉपिंग सेंटरवरील होर्डींग्ज  स्वछता निरीक्षक दत्ता सांळुके यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. खाजगी होर्डींग्ज मात्र अद्याप काढले नसल्याचे दिसुन आले.

 
Top