धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील कौडगाव येथील बाल संस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथे पाच दिवसांच्या बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी संताच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजनाने सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे धाराशिव तालुकाध्यक्ष हभप मोहन वागुलकर, केज येथील माऊली वारकरी संस्थेचे अध्यक्ष हभप बाळासाहेब लाखे महाराज, सरपंच दयानंद थोरात, पिंटू नाईकवाडी, मारुती ठाकर, सुभाष गरड, भाऊसाहेब थोरात, दादा कागदे, प्रदीप थोरात, वैभव सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये पाच दिवस हरिपाठ, बाल कीर्तनकार यांचे कीर्तन, मृदंग वादन, हार्मोनियम वादन यांचे वर्ग घेतले जाणार आहेत. तर हभप मोहन वागुलकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

 
Top