कळंब (प्रतिनिधी)- बस स्थानकासमोरील असलेली एक पान टपरी रात्री दि. 22 मे रोजी  काही गाव गुंडांनी मिळून ना लीत  ढकलून पान टपरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची तक्रार विलास मुळीक यांनी कळंब  पोलिसात केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब व स्थानकासमोरील रोडलगत असलेली विलास मुळीक यांचे पान टपरी काही गाव गुंडाने रात्री एक ते पाचच्या दरम्यान मोठ्या नालीत ढकलून दिली. पान टपरीचे जवळपास 40 ते 50 हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार कळंब पोलिसांत करण्यात आली आहे. याबाबत कळंब पोलीस या गावगुंडाचा शोध घेत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी दिली आहे.

 
Top