धाराशिव (प्रतिनिधी)- गोवर्धनवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. ही लोकशाही आणखीन बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.



माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, भाजपचे नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क तेर येथे बजावला. 



शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे, प्राचार्य अनिल वसंतराव काळे, श्रीमती शांताबाई वसंतराव काळे, शुभांगीताई विक्रम काळे, संजना विक्रम काळे, मयुरी अनिल काळे, ऐश्वर्या अमोल काळे, रणवीर अनिल काळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. 



भाजपा नेते, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी धाराशिव लोकसभेकरिता परंडा येथे कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर पत्नी सौ. शैला, मुलगी डॉ. सुयशा व मुलगा समरजीतसिंह यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.




 राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी धनेश्वरी बोरगाव ता.कळंब येथे सपत्नीक मतदान केले.

 
Top