धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील पळसप येथील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांचे चिरंजीव सचिन लक्ष्मण सरडे यांचे सोमवार दि. 6 मे रोजी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास ऱ्हदयविकाराने धाराशिव येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर धाराशिव येथील कपिलधार स्मशानभूमीत सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. ऐन तरूण वयात निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 
Top