तुळजापुर (प्रतिनिधी) - तालुक्यांतील मौजे इटकळ येथे लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवार दि.7 मे 2024 रोजी अगदी शांततेत पार पडले. मौजे इटकळ येथे दोन मतदान केंद्र असुन मतदान केंद्र क्रमांक 317 मध्ये एकूण मतदार 998 त्यापैकी 671 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मतदान केंद्र क्रमांक 318 मध्ये एकूण मतदार 946 त्यापैकी 675 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण दोन मतदार केंद्रावरील 1943 मतदारा पैकी 1346 मतदारांनी रखरखत्या उन्हात ही मतदानाचा हक्क बजावत कर्तव्य पार पाडले. सरासरी 69.27 टक्के मतदान झाले. मतदान शांततेत व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील विनोद सलगरे, तलाठी मुळेकर मॅडम व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.


 
Top