धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे मतदान केंद्राजवळ ठाकरे शिवसेनेचे समाधान नानासाहेब पाटील, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांची हत्या झाली होती. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक गौहर हसन यांनी सदर प्रकरण गांभिर्याने घेवून फरार आरोपीचा शोध स्थानिक गुन्हा शाखेकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांच्या पथकाने कुर्डवार्डी व बीड येथून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली.


दि. 07.05.2024 रोजी बसस्थानक व मतदान केंद्राजवळ पाठसागंवी येथे आरोपी आप्पाराव भिमराव नाईकनवरे, राजकुमार भिमराव नाईकनवरे,  दत्तात्रय भिमराव नाईकनवरे, गौरव आप्पाराव नाईकनवरे सर्व रा.पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांनी भारत चंद्रशेखर पाटील याला बसस्थानक पाठसांगवी येथे का मारले असे विचारण्यासाठी गेल्याचे कारणावरुन आरोपी गौरव नाईकनवरे यांनी मयत समाधान पाटील याचे पोटात डाव्या बाजूस चाकु मारुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी शंकर शरद शिंदे यांनी दिली होती. यावरून कलम 302, 326, 34 अन्वये भूम पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान दोन पथके रवाना झाले. पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नमुद गुन्हन्यातील आरोपी हे कुर्डवाडी येथे आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून आरोपी गौरव आप्पा नाईकनवरे, वय 21 वर्षे, आप्पा भिमराव नाईकनवरे, वय 47 वर्षे, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना ताब्यात घेतले. तसेच राजकुमार भिमराव नाईकनवरे, वय 43 वर्षे रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यास बीड येथुन ताब्यात घेवून नमुद तीन आरोपी यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सागिंतले समाधान पाटील यांचे पोटात चाकू मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे,  सचिन खटके, पोहेकॉ अमोल निंबाळकर, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढगारे, पोकॉ रविंद्र आरसेवाड, चालक ब विजय घुगे, किवंडे यांच्या पथकाने केली आहे.


 
Top