सोलापूर (प्रतिनिधी)- दिनांक 10 मे 2024 रोजी विजापूर रोड येथील ‌‘रेल्वे वन विहार' येथै श्री नीरज कुमार दोहरे मंडल रेल प्रबंधक सोलापूर यांच्या हस्ते झाडांची पुजा करुन ‌‘अक्षय तृतीया' सण झाडांसोबत साजरा करण्यात आला. आगीमुळे प्रभावित झाडांना पालवी फुटून पुन्हा बहरल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. 

नेहमीप्रमाणे तेथील रहिवासी  मोतेकर यांच्या कडून पाणी घेऊन हे सुत्य कार्य रेल्वे विभागातील अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमींनी केला. याप्रसंगी प्रत्येक झाडाला पाणी मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला. आज जवळपास 2500 लिटर पाणी दिले व आंबा, नारळ, सिताफळ, बांबू आणि कारंज अशी नवीन रोपटी लावण्यात आली.  त्याच बरोबर पक्षांची पाण्याची वनवन होऊ नये म्हणून श्रीमति रुक्मिणी कदम यांनी जवळपास 100 जल-कुंडाचे दान केले व काव्य वाचन केले. तेथील झाडांवर पाण्याची सोय सुध्दा करण्यात आली.

दोहरे यांनी या स्तुत्य सेवेत नियमित सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक करुन प्रत्येकाला आवाहन केले की एक पाणी बोटल-एक झाड हि संकल्पनेचा प्रखरतेने सर्वत्र वापर व्हावा या साठी पुढाकार घ्यावा. त्यांनी पर्यावरणासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. 

शिवाजी कदम तसेच नूतन वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी श्री. रामचंद्रन आणि इतर वरिष्ठांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी वेळोवेळी या झाडांना पाणी देऊन संगोपन करणे गरजेचे आहे.  या मध्ये प्रत्येकाचे योगदान जरुरीचे आहे. पर्यावरण प्रभारी (यांत्रिक विभाग) श्री जितेंद्र आर. वाघमारे यांनी श्री शिवाजी कदम व तसेच नव्याने रुजू झालेले श्री रामचंद्रन वरिष्ठ संरक्षा अधिकारी, श्री बी आर भगत सहाय्यक संरक्षा अधिकारी,  पर्यावरण प्रेमी श्री प्रवीण तळे, संत निरंकारी मंडळाचे सदस्य अनिता पवार आणि सदस्य  व संरक्षा विभागाची संपूर्ण टीम अशा जवळपास 35 लोकांचे आभार व्यक्त केले व आपले योगदान निरंतर चालू ठेवण्याची विनंती केली. 

झाडांना पुनर्जीवित करण्यासाठी  सतत प्रयत्न करणारे पर्यावरण प्रेमीं श्री योगेश शेषगिरी (ट्रेकमन) श्री रोहित मैंदर्गीकर टेक्निशियन/सोलापूर यांचे वनविभागातील झाडांना नियमित रोज पाणी देऊन उन्हाळ्यात सुध्दा झाडे हिरवीगार ठेवून उल्लेखनीय काम करत आहेत.


 
Top